मृतात मुख्यत: ज्येष्ट नागरिकांचा समावेश
वार्ताहर / पुलाची शिरोली
पुलाची शिरोलीत १ ऑगस्ट ते १० सप्टेंबर २०२० पर्यंत अवघ्या चाळीस दिवसात तब्बल ३२ व्यक्तींचा वेगवेगळ्या आजाराने मृत्यू झाला आहे. इतक्या मोठ्या संख्येने मयत होण्याची गावातील पहिलीच घटना आहे. यामध्ये विशेषतः नामांकित दिग्गज पुरुष व महिलांचा समावेश आहे.
सध्या गावात सुमारे अडीचशे कोरोना रुग्णांची संख्या आहे. ही साखळी आटोक्यात आणण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पण कोरोनाची वाढती संख्या व भिती ही अत्यंत चिंतेची बाब आहे. मयत झालेले रुग्ण हे साठ ते पासष्ट वयाच्या पुढील आहेत. त्यांचा आजारांचा इतिहास पहाता दमा, डायबेटिस, धाप लागणे, श्र्वसनाचा ञास , कॅन्सर या सारख्या आजारामुळे उपचार घेत होते. यापैकी मोजक्याच लोकांचा कोरोन अहवाल पॉझिटिव्ह आला होता. तर अनेक रुग्ण वयोवृद्ध होवून व इतर आजाराने मयत झाले आहेत.
यामध्ये वारकरी संप्रदायातील एकनाथ चव्हाण, ग्रामपंचायत माजी वरिष्ठ लिपिक पांडूरंग करपे, ट्रॅक्टर व्यावसायिक रामचंद्र वठारे, प्रगतशील शेतकरी व पेट्रोलपंप चालक आप्पासाहेब पाटील, नोकरदार नामदेव हुबाळे, मोटर मेकॅनिकल नामदेव पाटील, माजी लाईनमन भिमराव पाटील, कॅशियर दत्ता आंबुसकर, गृहिनी शोभा गायकवाड, लक्ष्मीबाई कौंदाडे, विष्णू पाटील, लक्ष्मण पाटील, शामराव चव्हाण आदींचा समावेश आहे.
सध्या कमी दिवसांत इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण मयत झाल्याची हि पहिलीच व चिंताजनक घटना आहे. असे मत गावातील जाणकार लोक सांगत आहेत. मयत लोकांचे नातेवाईक मृत्युची नोंद घालण्यासाठी शिरोली ग्रामपंचायत मध्ये ये जा करत आहेत.
Previous Articleदेहरादून : भाजप आमदार उमेश शर्मा काऊ यांना कोरोनाची बाधा
Next Article विनामास्क फिरणा-यांवर गगनबावडा पोलीसांची धडक कारवाई









