ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या मेजर विभूती धौंडियाल यांची पत्नी नितीका धौंडियाल’ या देखील सैन्यात दाखल होत लेफ्टनंट पदावर रुजू झाल्या आहेत. भारतीय सैन्यात भरती झाल्यानंतर नितीका यांनी सैन्याचा गणवेश परिधान करत हूतात्मा विभूती धौंडियाल यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसा सोशल मीडियावर तसा व्हिडीओ ही प्रसारित झाला आहे.
18 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. यात 40 भारतीय सैनिक शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पुलवामानजीक पिंगलवान गावात दहशतवाद्यांशी दोन हात करताना झालेल्या चकमकीत हे भारतीय सैनिक शहीद झाले होते. यामध्ये विभूती धौंडियाल यांचा ही समावेश होता.
मेजर विभूती धौंडियाल व नितीका धौंडियाल यांचा विवाह दहा महीन्यापूर्वीच झाला होता. या अल्पावधीतच विभूती धौंडियाल यांना विरगती प्राप्त झाली होती. या वेळी पत्नी नितीका यांनी पार्थिवाजवळ उभा राहत जय हिंद च्या घोषणा दिल्या होत्या, तसेच तू माझ्यापेक्षा अधिक प्रेम मातृभूमीवर केलेस याचा मला सार्थ अभिमान असल्याचे त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या होत्या. 30 वर्षीय नितीकाने गेल्याचवर्षी एसएससी परीक्षा दिली होती. त्यानंतर त्या भारतीय सैन्य दलात दाखल झाल्या आहेत.
पहा काय म्हणतायेत #_lieutenant_NitikaKaul