ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास CRPF च्या तुकडीवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या 180 बीएन तुकडीवर ग्रेनेड फेकले. त्यात सीआरपीएफचे एएसआय असीम अली जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर आहे. सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घातला असून, हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
दरम्यान, शनिवारी जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीदरम्यान सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता. ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख लष्कर-ए-तोयबाचा आयईडी तज्ज्ञ नासिर शकील साब शक भाई अशी करण्यात आली होती.









