ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील हांजी राजपुरा परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांना घेरले असून, गोळीबार सुरू आहे. सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकाद्वारे ही कारवाई केली जात आहे. यात लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफच्या पथकांचा समावेश आहे.
हांजी राजपुरा परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने या परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. गोळीबाराला सुरक्षा दलाचे जवान चोख प्रत्युत्तर देत आहेत. या गोळीबारात एक जवान शहीद झाला आहे. सुरक्षा दलांनी 4 दहशतवाद्यांना घेरले असून, गोळीबार सुरू आहे.









