निर्णायक अंतिम लढतीत फ्रान्सला नमवले, पहिल्या फेरीतील पराभवाचा वचपा काढला
गटातील बास्केटबॉलचे सुवर्ण जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला. डय़ूरॅन्टच्या बहारदार खेळामुळे अमेरिकेने फ्रान्सला 87-82 अशा निसटत्या फरकाने मात दिली. अमेरिकेसाठी या खेळातील हे 16 वे ऑलिम्पिक सुवर्ण ठरले. डय़ूरॅन्टने सर्वाधिक 29 गुण संपादन करत कार्मेलो ऍन्थोनीचा मागील विक्रम देखील मोडीत काढला.
मागील काही सामन्यात अमेरिकेने अतिशय संथ सुरुवात केली होती. पण, या निर्णायक अंतिम लढतीत त्यांनी फ्रान्सवर प्रारंभापासूनच अतिशय दडपण ठेवले. प्रारंभी घेतलेली 18 गुणांची टर्नओव्हर फ्रान्ससाठी महाग ठरली आणि प्रेंच कर्णधार निकोलस बॉटमने ते प्राधान्याने कबूल केले.
टोकियोच्या नॉर्थ एरेनामध्ये आयोजित या फायनलला चाहत्यांना काही प्रमाणात प्रवेश दिला गेला होता. फ्रान्ससाठी पुरुषांच्या बास्केटबॉलमधील हे तिसरे ऑलिम्पिक रौप्य असून कांस्यपदकाच्या लढतीत यंदा पदार्पण करत असलेले स्लोव्हेनिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध लढणार आहे.
1936 पासून अमेरिकन पुरुष संघाने या इव्हेंटवर आपला दबदबा राखला असून यंदाच्या ऑलिम्पिकपूर्वी त्यांनी 15 सुवर्णपदके जिंकली होती. तोच दबदबा यंदाही कायम राखण्यात ते यशस्वी ठरले.









