केरळमधील कोझिकोडे या शहरातील सहद आणि जिया पावल हे एक ट्रान्सजेंडर जोडपे आहे. त्यांच्यामध्ये जो पुरुष आहे त्याला आता आश्चर्यकारकरीत्या दिवस गेले आहेत. येत्या महिनाभरात म्हणजे साधारणतः मार्चमध्ये तो बाळंत होईल, अशी शक्यता आहे. अशा प्रकारे जो तांत्रिकदृष्टय़ा पुरुष आहे, त्याला मूल होण्याचा हा भारतातील पहिलाच प्रकार असेल, असे मानले जात आहे. सर्वसाधारणपणे पत्नी गर्भवती राहिल्यानंतर पती तिची सर्वप्रकारे काळजी घेतो. येथे पत्नी पतीची अशाचप्रकारे काळजी घेत आहे.

जिया ही पत्नी शास्त्राrय नृत्य शिक्षिका आहे. या दोघांनी तीन वर्षांपूर्वी एकत्र राहणे सुरू केले. ट्रान्सजेंडर जोडप्यांना सहसा समाजात मानाचे स्थान मिळत नाही. त्यांचे कुटुंबीयही त्यांच्यापासून दूर राहणेच पसंत करतात. तथापि, हे जोडपे समाजामध्ये मिसळण्याचा प्रयत्न करते. या जोडप्यापैकी जो पुरुष आहे, तो लिंगबदल करून महिला झालेला आहे. आणि आता तो गर्भवती आहे.
सहद ही 23 वर्षांची असून जिया ही 21 वर्षांची आहे. प्रारंभी या दोन्ही महिला होत्या. पण जिया हिने लिंगबदल करून स्वतःला पुरुष बनविले. तथापि, नैसर्गिक प्रक्रियेनुसार आता ती माता होणार आहे. माता होणे तसे कठीण नाही, असे डॉक्टरांचे मत आहे. त्याचे बाळंतपण ऑपरेशन करूनच करावे लागणार आहे. तथापि, समस्या नंतरच उद्भवणार आहे. नवजात अर्भकाला स्तनपान कसे करायचे? हा प्रश्न आहे. त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.









