प्रतिनिधी / सातारा :
अतिवृष्टीमुळे 22 जुलै रोजी जिल्हय़ातील अनेक शाळांचे आतोनात नुकसान झाले. या शाळा आता पुन्हा नव्याने उभारण्याकरीताचा ठराव जिल्हा परिषदेच्या बैठकीत संमत करण्यात आला. कित्तेक शाळांचे तसेच शाळांच्या मैदानांचे ही अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे संबंधीत शाळेच्या मैदानांची उभारणी, भिंती बांधने, क्रिडा विषयक साहित्य आदींसाठी जवळपास 2 कोटींचा निधीची मागणी यावेळी जिल्हा नियोजन समितीकडे पाठविण्यात आली.
अतिवृष्टीच्या परिणामामुळे शाळेच्या इमारतींचे तसेच शाळेत असलेल्या क्रिडा विषयक साहित्यांचे ही तितक्याच प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे हे साहित्य पुन्हा नव्याने उभारण्याचा ठराव ही यावेळी संमत करण्यात आला. याप्रसंगी अरूण गोरे, प्रदिप पाटील, मानसिंगराव जगदाळे यांच्यासह शिक्षक संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.









