पुरपरिस्थितीची गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली पाहणी
प्रतिनिधी / सातारा
पाटण परिसरात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे पाटण शहर व विविध ठिकाणी पुरपरिस्थिती निर्माण होते. संबंधित यंत्रणांनी पुरग्रस्तांसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशा सुचना गृह(ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
पाटण विधानसभा मतदारसंघातील अतिवृष्टी व पुरपरिस्थितीच्या अनुषंगाने गृह(ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आढावा बैठकीत दिल्या. याप्रसंगी त्यांच्या समवेत प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, प्र. उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील व संबंधित यंत्रणांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी त्यांनी संभाव्य पुरस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करुन आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत सांगितले.
यावेळी अतिवृष्टीमुळे कोयना नदीला पुर आल्याने पाण्याखाली गेलेल्या मुळगाव पुलाची पाहणी व पाटण एस.टी. स्टँड परिसरातील पुरपरिस्थितीची पाहणी गृह(ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









