नवी दिल्ली
कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर विविध कंपन्यांनी पुन्हा वर्क फ्रॉम होम प्रणालीला प्रारंभ केला असल्याचे समजते. सध्या ऑफिसचे काम घरातून करण्याचा सल्ला कर्मचाऱयांना दिला असून एप्रिलनंतर ऑफिसमध्ये परतण्याचे आदेश काही कंपन्यांकडून देण्यात आल्याचे कळते. सिप्ला या फार्मा कंपनीने ही प्रणाली सुरू केली असून महिंद्राही यात सामील झाल्याचे समजते.









