मुंबई / ऑनलाईन टीम
महाराष्ट्रात कोरोना रूणांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढती कोरोनाची रूग्ण संख्या लक्षात घेता महाराष्ट्र सरकार पुन्हा एकदा लॉकडाउन करण्याचा विचार करत असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र या लॉकडाउनला राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर विरोध केला आहे. यादरम्यान काँग्रेस नेते संजय निरुपम यांनीदेखील एका वृत्त वाहिनीशी बोलताना पुन्हा लॉकडाउन आणून लोकांना त्रास देऊ नका असे म्हणत लॉकडाउनवरुन संताप व्यक्त केला आहे.
संजय निरुपम म्हणाले की, चुकीचे नियोजन आहे. पुन्हा लॉकडाउन लागू करण्याचा जो विचार सुरु आहे त्याला आमचा विरोध आहे. कारण गेल्या वर्षी जो लॉकडाउन लागू केला होता त्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात लोकांना बेराजगारीचा सामना करावा लागला होता. कारखाने बंद झाले होते आणि व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता. सव्वा तीन कोटी लोक लॉकडाउनमुळे गरीब झाल्याचा एक रिपोर्ट आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाउन आणून लोकांना त्रास देऊ नका, असे त्यांनी यावेळी सांगितले.
यासोबतच संजय निरुपम पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे नेते जे सरकारमध्ये आहेत त्यांना लॉकडाउनचा विरोध करण्यासाबंधी बोलणार आहे. लोकांमध्ये लॉकडाउनची खूप भीती आहे. बेरोजगारी पुन्हा येईल अशी भीती लोकांना वाटत असल्याचे ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








