रांची
राष्ट्रीय जनता दलप्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडली आहे. यामुळे लालूंना रांची येथील रिम्समधून दिल्लीतील एम्समध्ये हलविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रिम्सच्या मेडिकल बोर्डाने त्यांच्या प्रकृतीची समीक्षा केल्यावर हा निर्णय घेतला गेला. लालू यादव हे सध्या चारा घोटाळय़ाप्रकरणी शिक्षा भोगत असले तरीही प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल होते. मंगळवारी त्यांची प्रकृती बिघडली होती लालूंना हृदय आणि किडनीचा आजार असल्याचे रिम्सचे संचालक कामेश्वर प्रसाद यांनी सांगितले आहे. तर लालूंच्या जामीन अर्जावर 1 एप्रिल रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकते.









