प्रतिनिधी/ सातारा
शहर परिसरासह जिल्हय़ात पुन्हा पावसाने हजेरी लावली होती. सायंकाळच्या दरम्यान ढगांच्या गडगडाटासह पावसाच्या सरींना सुरूवात झाली. ऐन गुढीपाडवा सणादिवशी ही पावसाने पुन्हा ऐंट्री केली. गेल्या चार ते पाच दिवासांपासून जिल्हय़ात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी अवकाळी पावसाची नियमीत हजेरी होत आहे.
फलटन, कोरेगांव, खंडाळा आदी भागात ही पावसाने हजेरी लावली होती. वादळी वाऱयांसह पडणाऱया या पावसाने मात्र शेतीपिकांचे मात्र आतोनात नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासुन पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने आधीच वर्तविली होती. त्यामुळे कित्तेक कामानिमित्त बाहेर जाणाऱया नागरिकांनी छत्री, रेनकोट सारख्या साहित्य आपल्या सोबतच नेले होते.








