बेंगळूर / प्रतिनिधी
नुकतेच निधन पावलेले कन्नड चित्रपट स्टार पुनीत राजकुमार (Punit Rajkumar) यांना मरणोत्तर ‘पद्मश्री’ (Padmarshi)पुरस्कार मिळावा यासाठी लोकांमधुन विशेषत: फॅन्समधुन मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.कारण कर्नाटक सरकारच्या दोन मंत्र्यांनी रविवारी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात केंद्राकडे शिफारस करण्याची विनंती केली.
मॅटिनी आयडॉल डॉ. राजकुमार यांच्या पाच मुलांपैकी सर्वात धाकटा असणारे पुनीत राजकुमार यांचा 29 ऑक्टोबर रोजी वयाच्या 46 व्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ते जिवंत असतानाच पुनीत राजकुमार यांनी केलेल्या कार्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळायला हवा होता. परंतु दुर्दैवाने ते आता शारीरिकदृष्ट्या आपल्यासोबत नाहीत, तरी त्यांना मरणोत्तर द्यावा लागेल. ” मीही एक चाहता म्हणून,इतर चाहत्यांमध्ये (त्यांच्या मागणीत) सामील होतो. मी सरकारचा एक भाग असल्याने, मी मुख्यमंत्र्यांना तशी शिफारस केंद्राकडे करण्याची विनंती करतो. मंत्री म्हणाले, जर हा विषय मंत्रिमंडळासमोर आला तर त्याला एकमताने संमती मिळेल.









