बेंगळूर / प्रतिनिधी
कोविड साथीच्या आजाराने त्रस्त झालेल्या नेत्रदानाला पुनीतच्या अकाली निधनानंतर पुन्हा एकदा वेग आला आहे.कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांनी नेत्रदान करण्याच्या उदात्त आदर्शाने कर्नाटकात नेत्रदानाची एक प्रकारची चळवळ निर्माण केली आहे.
कोविड महामारीमुळे मोठा फटका बसलेल्या नेत्रदानाला पुनीत यांच्या अकाली निधनानंतर पुन्हा एकदा वेग आला आहे. पुनीतराजकुमार यांच्या नेत्रदानाची प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा झाली आणि नेत्रदानाबाबतचा सर्व संकोच दूर करून चांगला संदेश समाजामध्ये गेला आहे. नारायण नेत्रालयाचे संस्थापक डॉ. भुजंगा शेट्टी, ज्यांनी पुनीतचे डोळे काढुन त्यांचे दुसऱ्या व्यक्तींवर यशस्वीरित्या प्रत्यारोपण केले. त्यांनी अशी माहिती दिली की अभिनेत्याच्या हावभावामुळे लोकांमध्ये नेत्रदानाविषयी खूप जागरूकता निर्माण झाली असुन कर्नाटकात नेत्रदान चळवळ तयार होण्यास मोठी उर्जा मिळाळी आहे.