बेंगळूर प्रतिनिधी
कन्नड सिनेमाचा ‘पॉवर स्टार’ पुनीत राजकुमार यांचे गेल्या ऑक्टोबरमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने दिग्दर्शक चेतनकुमारच्या ‘जेम्स’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मोठा धक्का बसला. ‘पॉवर स्टार’ पुनीत राजकुमार या चित्रपटाचा चेहरा होते.
हा चित्रपट सध्या चालू असलेल्या १३व्या बेंगळुरू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा भाग असून दिग्दर्शक चेतनकुमार व्यतिरिक्त, निर्माता सूरप्पा बाबू, प्रसिद्ध चित्रपट निर्माते पी शेषाद्री, ज्येष्ठ दिग्दर्शक एस के भगवान, आणि चित्रपट निर्माता पवन वाडेयर यांनी त्यांच्या आठवणी शेअर केल्या.
चेतनकुमार याला एक दुर्मिळ परिस्थिती म्हणताना त्याला चित्रपट पूर्ण होईपर्यंत पुनीत मार्गदर्शन करत असल्याचे भासत होते अस सांगितले. तो म्हणाला, “पुनित हा माझा प्रेरक शक्ती होता. माझ्यासोबत नसतानाही, मला त्याचा पाठींबा आहे असे मला नेहमीच वाटले.” तो म्हणाला. ‘जेम्स’, जो एक अॅक्शन ड्रामा असून तो संपूर्ण जगात रिलीज होणार आहे.
या चित्रपटाचे नायक असलेले पुनितकुमारच्या आवाजाची डबिंग प्रक्रिया हे दिग्दर्शकासमोरील सर्वात मोठे आव्हान होते. पुनीतचा आवाज डब करण्याच्या अनेक प्रयत्नांनंतर शेवटी ज्येष्ठ अभिनेते शिवराजकुमार आपल्या भावासाठी आवाज देला आहे. सर्वांना शिवराजकुमार हाच सर्वोत्तम पर्याय वाटला.