ऑनलाईन टीम / मॉस्को :
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना सन 2036 पर्यंत निवडणूक लढवण्याचा आणि सत्तेत राहण्याचा अधिकार देण्यात आला आहे. यासंदर्भातील एक विधेयक रशियन संसदेत मंजूर करण्यात आले आहे.
पुतीन हे सलग दुसऱ्यांदा आणि आतापर्यंत चौथ्यांदा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी आहेत. त्यांचा कार्यकाळ 2024 ला संपत आहे. मात्र, पुन्हा राष्ट्राध्यक्ष राहता यावे, म्हणून त्यांनी मागील वर्षी देशातील नागरिकांकडून मतपत्रिका मागविल्या होत्या. त्यामध्ये त्यांना 6 वर्षांचे आणखी दोन कार्यकाळ सत्तेमध्ये राहण्याची मुभा देण्याबाबत नागरिकांनी मते दिली होती. या प्रस्तावाला रशियन संसदेने मंजुरी दिली.
2024 नंतर रशियन राष्ट्राध्यक्षांसाठी 6-6 वर्षांची मुदत असेल. पुतीन यांनी दोन्ही वेळा विजय मिळविला, तर ते 2036 पर्यंत रशियाचे राष्ट्राध्यक्ष राहतील.









