पुणे \ ऑनलाईन टीम
पुणे महापालिकेमध्ये २३ गावांचा समावेश झाल्यामुळे पुणे महापालिका क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठी महापालिका ठरली आहे. यामुळे पुण्याची हद्द चारही बाजूंनी वाढली आहे. त्याचबरोबर पुण्याच्या लोकसंख्येतही दहा ते बारा लाखांची भर पडणार आहे.
हद्दवाढीनंतर पुणे शहराचं भौगोलिक क्षेत्रफळ आता ५१६.१६ चौरस किलोमीटर झालं आहे. २३ गावांचा महापालिका हद्दीत नव्याने समावेश करण्यात आल्याने ह्या क्षेत्रफळात वाढ झाली आहे. मुंबईचं भौगोलिक क्षेत्रफळ ४४० चौरस किलोमीटर असून आता पुण्याने मुंबईलाही मागे टाकलं आहे. नव्या हद्दवाढीमुळे पुणे आता देशातल्या सर्वात मोठ्या शहरांपैकी सातव्या क्रमांकाचं शहर बनलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, पुण्यातील प्रशासकीय अधिकारी आणि पुण्यातील काही आमदार यांच्या उपस्थितीत मंगळवारी (२९ जून) मंत्रालायत एक बैठक पार पडली. या बैठकीत पुण्यालगत असणाऱ्या २३ गावांचा समावेश महानगरपालिकेत करण्यात यावा यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या निर्णयानंतर पुणे महापालिका ही राज्यातील सर्वात मोठे क्षेत्रफळ असणारी महापालिका ठरली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








