पुणे \ ऑनलाईन टीम
पुणे तसंच ज्या ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे त्या ठिकाणी लॉकडाऊन करण्याची सूचना मुंबई हायकोर्टाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आज आढावा बैठक घेणार असून पुण्यात दाखल झाले आहेत. यावेळी लॉकडाऊनवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
पुण्यातील स्थिती अद्यापही गंभीर आहे. त्यामुळे पुणे तसंच ज्या ठिकाणी रुग्णसंख्या वाढत आहे तिथे गेल्या वर्षीसारखा लॉकडाऊन लावा असं मुंबई हायकोर्टाने म्हटलं आहे. आम्हाला आदेश द्यायला लावू नका असंही कोर्टाने सांगितलं. त्यामुळे अजित पवार लॉकडाऊनसंबंधी काय निर्णय घेणार याची माहिती बैठकीनंतर मिळेल.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








