नवी दिल्ली
बांधकाम प्रकल्पांचा विचार करता पुण्यात वर्षातील पहिल्या सहामाहीत नव्या प्रकल्पांच्या उभारणीत 30 टक्के इतकी घट झाल्याचे दिसून आले आहे. गेरा या संस्थेने याबाबतचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला आहे. दुसऱया कोरोनाच्या लाटेमुळे बांधकाम क्षेत्रावर निर्बंध लादले गेल्याने नव्या प्रकल्प उभारणीवर त्याचा परिणाम जाणवला आहे. 2021 च्या जानेवारी ते जून या कालावधीत पुण्यात 26 हजार नवे प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. न खपलेल्या घरांची संख्या 59 हजार 224 इतकी राहिली असल्याची नोंद अहवालात करण्यात आली आहे.









