ऑनलाईन टीम / पुणे :
बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीमध्ये गुंतविलेले पैसे परत मिळत नसल्याने एका ज्येष्ठ नागरिकाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. आज पहाटे साडेचार वाजता ही घटना उघडकीस आली.
तानाजी गणपत कोरके (वय 61, रा. भीमनगर, घोरपडी) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तानाजी कोरके यांनी डीएसके यांच्या कंपनीत 4 लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. त्याची मुदत 2017 मध्ये संपली. मात्र, डीएसके कंपनी आर्थिक डबघाईला आल्यामुळे तेव्हा कोरके यांना पैसे मिळू शकले नाहीत. त्यामुळे कोरके यांच्या मुलीचे लग्न रखडले होते. त्यांच्याकडे दुसरा पैशांचा मार्ग नव्हता. मुलीचे लग्न करु शकत नसल्याची खंत त्यांना होती. त्यामुळे त्यांनी काल रात्री घरातील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीत पुणे, मुंबई, कोल्हापूर, नाशिकसह अनेक शहरातील नागरिकांनी हजारो कोटी रुपये गुंतविले आहेत. मात्र, डीएसकेंनी या पैशांची योग्य गुंतवणूक न केल्याने कंपनी डबघाईला आली आणि लोकांची देणी देणे शक्मय झाले नाही. त्यामुळे गेल्या वषी फसवणुकीच्या गुह्यात त्यांना पत्नीसह अटक झाली आहे. सध्या ते येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.









