ऑनलाईन टीम / पुणे :
पुण्यात मंगळवारी दिवसभरात 266 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर सर्वाधिक 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 6795 वर पोहचली असून, मृतांची संख्या 345 एवढी आहे.
आज दिवसभरात 169 कोरोना रुग्ण बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत पुणे शहरातील 4 हजार 119 रुग्ण बरे झाले आहेत. आज 1543 रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
राज्यात आज दिवसभरात 2 हजार 287 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 1 हजार 225 जणांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या 72 हजार 300 वर पोहचली आहे.








