ऑनलाईन टीम / पुणे :
सीरम इन्स्टिट्यूटमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

मृत झालेले बांधकाम मजूर असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, 6 व्या मजल्यावर जळालेल्या अवस्थेत हे मृतदेह आढळले. मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
दरम्यान, कोरोनाची लस तयार करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये ही आग लागली होती. पण अंडर कन्स्ट्रक्शन असलेल्या इमारतीत आग लागल्याने मोठी हानी टळली आहे. या आगीतून 6 जणांना वाचवण्यात यश आलं आहे.

या घटनेबाबात अधिक महिती देताना संस्थेचे प्रमुख आदर पुनावाला म्हणाले की, या आगीत कोरोना लसीच्या प्रोडक्शनचे कोणतेही नुकसान झालेले नाही.
दरम्यान, या घटनेची माहिती घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत.








