प्रतिनिधी / वाकरे
कुडित्रे (ता. करवीर) येथील श्रीराम ज्युनिअर कॉलेजचे प्रा. जयंत दिनकरराव आसगावकर यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजून ४५ मिनिटांनी पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषद निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी दाखल करणारे प्रा. आसगावकर हे पहिलेच उमेदवार ठरले आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांच्याकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
पुणे शिक्षक मतदार संघात पुणे, सातारा, सोलापूर सांगली, कोल्हापूर या पाच जिल्ह्यांचा समावेश असून येत्या १ डिसेंबर रोजी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून प्रा.जयंत आसगावकर यांनी मंगळवारी विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी कोडोली विभाग शिक्षण संघाचे अध्यक्ष अशोकतात्या पाटील, कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठचे अध्यक्ष एस. डी लाड, डी.बी.पाटील शैक्षणिक विचार मंचचे व्ही.जी.पोवार, आर. वाय. पाटील, रंगराव तोरस्कर, जयसिंग पोवार, शिवाजी चौगले, दत्तात्रय जाधव, सांगरूळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यशवंत खाडे, संचालक बी. आर.नाळे, सदाशिव खाडे, आनंदा कासोटे, डी.जी.खाडे, के.के.पाटील, उदय पाटील, कोजिमाशी पतसंस्थेचे संचालक प्रा.समीर घोरपडे, संदीप पाटील, विनोद उत्तेकर,बी.के.मोरे, क्रीडा शिक्षक संघटनेचे संदीप पाटील, आर.बी.पाटील, अमित शिंत्रे, संदीप पात्रे, कोजिमाशी पतपेढीचे चेअरमन पी.जी.वरेकर, संचालक तानाजी पाटील, शिवाजी लोंढे, एल.डी.पाटील, एस.बी पाटील, अंकुश कवडे, शहाजी शिंदे, प्रभाकर धामणे, उत्तम तिबिले, अजित पाटील, धैर्यशील पाटील, महेश पाटील-सांगली यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील शिक्षक संघटनांचे अनेक पदाधिकारी, शिक्षक, तसेच शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.









