ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे शहरात पुन्हा एकदा कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ झालेली पहायला मिळत आहे. शहरात बुधवारी 399 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. तर 216 जण कोरोनातून बरे झाले आहेत. दिवसभरात 9 जणांचा कोरानामुळे मृत्यू झाला. तर पुण्याबाहेरील 4 जणांचा मृत्यू झाला.
पुणे महापालिका क्षेत्रात विविध कोविड सेंटर, खाजगी लॅब, रूग्णालये आणि रॅपिड ऍण्टिजेन किटद्वारे दिवसभरात आठ हजार 961 नागरिकांची तपासणी करण्यात आली. शहरात आजपर्यंत चार लाख 94 हजार 185 पॉझिटिव्ह रूग्ण आढळले असून, त्यातील चार लाख 83 हजार 221 जण बरे झाले आहेत.
सध्या शहरातील एकूण ऍक्टिव्ह रूग्णसंख्या दोन हजार 066 वर पोहचली आहे. तसेच 208 गंभीर रूग्णांवर विविध रूग्णालयात उपचार सुरू आहेत. शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आठ हजार 898 इतकी झाली आहे.