सांगली प्रतिनिधी
पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक मार्च महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी 14 मार्च रोजी विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर सकाळी 11.30 वाजता सभागृह क्र. 1, विभागीय आयुक्त कार्यालय, नवीन इमारत येथे आयोजित केली आहे. अशी माहिती पुणे विभागाचे उपायुक्त (महसूल) तथा विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती पुणे चे सदस्य सचिव यांनी दिली.
प्रत्येक तीन महिन्यातून एकदा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक आयोजित केली जाते. तीन महिन्यात आलेल्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपाययोजनांबाबत पुणे विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची आढावा बैठक नियमितपणे घेण्यात येते. बैठक सर्वसाधारणपणे तीन महिन्यानंतरच्या पुढील महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी विभागीय लोकशाही दिन झाल्यानंतर आयोजित करण्यात येते.









