ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 28 हजार 989 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 47 हजार 137 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण 16 हजार 619 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 1 हजार 529 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 632 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.50 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.24 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 39 हजार 395 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 24 हजार 508 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 13 हजार 806 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 10 हजार 99, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 2 हजार 640 व पुणे कॅन्टोंन्मेंट 87, खडकी विभागातील 47, ग्रामीण क्षेत्रातील 853, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 80 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 81 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 853, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 119 व पुणे कॅन्टोंन्मेंट 25, खडकी विभागातील 17, ग्रामीण क्षेत्रातील 45, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 22 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 442 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62.21 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.74 टक्के इतके आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 2 लाख 44 हजार 652 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 2 लाख 40 हजार 282 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 4 हजार 370 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 92 हजार 678 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 47 हजार 137 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.