ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागात 3 लाख 23 हजार 925 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 2 लाख 40 हजार 678 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या 75 हजार 903 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 8 हजार 344 जणांचा मृत्यू झाला आहे. विभागात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 74.30 टक्के तर मृत्यूचे प्रमाण 2.58 टक्के आहे. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी यासंदर्भात माहिती दिली.
पुणे जिल्ह्यात 2 लाख 20 हजार 692 रुग्णांपैकी 1 लाख 74 हजार 627 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सातारा जिल्ह्यात 22 हजार 863 रुग्णांपैकी 14 हजार 567 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सोलापूर जिल्ह्यात 22 हजार 863 रुग्णांपैकी 14 हजार 567 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.
सांगलीत 22 हजार 306 जणांना कोरोनाची बाधा झाली. त्यामधील 12 हजार 376 रुग्ण बरे झाले. कोल्हापूर जिल्ह्यात 33 हजार 886 रुग्णांपैकी 22 हजार 111 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.








