ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे विभागातील 1 लाख 1 हजार 636 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 46 हजार 340 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 40 हजार 906 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 798 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.60 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 69.45 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 12 हजार 131 रुग्णांपैकी 84 हजार 645 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 24 हजार 934 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 552 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.28 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 75.49 टक्के आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 7 लाख 28 हजार 942 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 1 लाख 46 हजार 340 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.








