ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा मान नगरसेविका दीपाली धुमाळ यांना मिळाला असून, नव्या विरोधी पक्षनेत्या म्हणून धुमाळ यांच्या नावाला हिरवा पंदील मिळाला. या पदाची जबाबदारी त्यांच्याकडे पुढील वर्षभरासाठी राहणार आहे.
या पदासाठी माजी महापौर वैशाली बनकर, स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम, नंदा लोणकर, नगरसेवक योगेश ससाणे, सचिन दोडके, महेंद्र पठारे यांनी अर्ज केला होता. मात्र, या सर्वांची नावे मागे पडून धुमाळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बराटे यांनी राजीनामा दिल्यानंतर पंधरा दिवस नव्या नावाची चर्चा सुरू होती. प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करीत होते. धुमाळ यांना राष्ट्रवादीची सत्ता येण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडावी लागणार आहे.









