वार्ताहर / गोकुळ शिरगाव
शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पुणे बेंगलोर महामार्गावर कणेरीवाडी फाट्याजवळ मोटरसायकलवरून जात असलेले चेतन काशिनाथ कासार वय 46 व स्वरूपा चेतन कासार वय 40 राहणार सौंदलगा तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव हे दोघे पती-पत्नी आपल्या मोटर सायकल वरून महामार्गावरून जात होते.
यावेळेला पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने यांच्या मोटरसायकलला जोराची धडक दिल्याने यामध्ये पाठीमागे बसलेल्या स्वरूपा या जागीच ठार झाल्या. धडक देऊन गेलेल्या अज्ञात वाहनाचा अजून पत्ता लागला नसुन या घटनेची नोंद गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल नागरगोजे करीत आहेत.









