ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये तसेच पूर्ण पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा लॉक डाऊन जारी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच केेेेली जाणार आहे.
या आदेशानुसार येत्या सोमवार पासून म्हणजेच 13 जुलैपासून पुढील 15 दिवस हे लॉक डाऊन असणार आहे. लवकरच याबाबतची सविस्तर नियमावली जाहीर केली जाणार आहे. दरम्यान, कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात येत नसल्यामुळे आज विधानभवनमध्ये कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मूलन आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मागील आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली होती. तसेच प्रशासनाला कडक उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या होत्या. तरी देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात लॉक डाऊन करण्याचे आदेश पवार यांनी आज दिले आहेत.
पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 30 हजारांकडे गेली आहे. यातील 13 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे तर आतापर्यंत 900 पेक्षा अधिक जणांनी आपला जीव गमावला आहे. दिवसागणिक पुणे आणि पिंपरीमधील कोरोनाबाधितांची वाढती संख्या चिंताजनक आहे









