प्रतिनिधी / शिराळा
पुणे पदवीधर आणि पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी शिराळा तालुक्यात एकूण अकरा केंद्रावर व्यवस्था करण्यात आली आहे. अशी माहिती तहसीलदार गणेश शिंदे यांनी दिली. पैकी पाच केंद्रे शिराळा याठिकाणी तर इतर केंद्रे शिरशी, कोकरूड आणि चरण या ठिकाणी आहेत.
शिराळ तालुक्यात पुणे पदवीधर मतदार संघ निवडणुकीसाठी सात केंद्रावर व्यवस्था करण्यात आली आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी चार केंद्रावर व्यवस्था करण्यात आली आहे. पदवीधरसाठीची चार केंद्रे अनुक्रमे 388, 388 ए,389 आणि 389 ए ही न्यू इंग्लिश स्कूल शिराळा येथे आहेत. तर केंद्र क्रमांक 385 भैरवनाथ विद्यालय ,शिरशी. 386 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चरण. 387 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकरूड येथे आहेत. तर पुणे शिक्षक निवडणुकीसाठी केंद्र क्रमांक 251 भैरवनाथ विद्यालय शिरशी, केंद्र क्रमांक 252 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चरण, 253 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकरूड आणि 254 न्यू इंग्लिश स्कूल शिराळा येथे व्यवस्था करण्यात आली आहे.
शिराळा तालुक्यात एकूण शिक्षक मतदार 497 आहेत तर एकूण पदवीधर मतदार 2833 आहेत.असे एकूण 3330 मतदार उद्या आपला हक्क बजावतील. यामध्ये 2391 पुरुष तर 939 स्त्री मतदार आहेत.
आरोग्य विभागाकडून प्रत्येक केंद्रावर दोन आरोग्य कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत. आरोग्य कर्मचारी प्रत्येक मतदाराची तपासणी करतील. तापमान तपासणीमध्ये कोणी संशयित आढळल्यास त्यांना दुपारनंतर मतदानाचे परवानगी देण्यात येईल.