प्रतिनिधी / सातारा
मराठा समाजाच्या तरुणांना नोकरीसाठी वणवण भटकावे लागत आहे. आरक्षण या सरकारमुळे मिळू शकले नाही. मागच्या सरकारने ही आरक्षणाचे घोंगडे भिजत ठेवले. त्यामुळे आता मराठा क्रांती मोर्चा मराठा युवकांच्या हक्कासाठी पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी पत्रकार परिषदेत सातारा येथे जाहीर केली.
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत समन्वयकांनी आपली भूमिका पत्रकारांच्या जवळ विशद केली. पुणे पदवीधर मतदार संघाची विधान परिषदेची होऊ घातलेली सार्वत्रिक निवडणुक मराठा क्रांती मोर्चा, महाराष्ट्र चळवळीचा उमेदवार देऊन पुर्ण ताकतीने लढवण्याचा इरादा पक्का केला आहे. आजपर्यंत आपण वेगवेगळ्या पक्षाचे मराठा उमेदवार निवडून दिले.
पण ते कधीही पदवीधरांच्या प्रश्नासाठी समाज्याच्या प्रश्नांसाठी पक्ष सोडून आपल्याबरोबर आरक्षण, शिक्षण, नोकरी याचे आपले जिव्हाळ्याचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी पुढे आले नाहीत. आता मराठा चळवळीचा मराठा विधान भवनात पाठवू. जो समाज्याचे, पदवीधरांचे प्रश्न उपस्थितत करेल तोच पदवीधरचा उमेदवार निवडताना आपण पाच जिल्ह्याचे मराठा क्रांती मोर्चा, मराठा संघटना मराठा पक्ष यांची जी कोअर कमिटी निवडू ते सर्वानुमते ठरवतील.
कोअर कमिटीबनवण्यासंदर्भात राजधानी सातारा येथे पाच ही जिल्ह्यातील प्रमुख बांधवांचा मेळावा घेणार आहोत. तेव्हा मराठा क्रांती मोर्चा चळवळीची नियमावली ठरवुन पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात येणार आहे. पश्चिम महाराष्ट्राची प्रभावी मराठा क्रांती मोर्चाची टिम राज्यात उभी होऊ शकते. तसा प्रयत्न आहे. हा पदविधर पॅटर्न राज्याच्या राजकारनाची दिशा बदलू शकतो यात तिळमात्र शंखा नाही, असे ही त्यांनी सांगितले.
Trending
- Testing1
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








