ऑनलाईन टीम / पुणे :
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 1538 वर पोहचली आहे. तर 230 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 85 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. ॲक्टीव रुग्ण संख्या 1223 आहे. त्यामधील 79 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे.
पुणे विभागातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1702 वर पोहचली आहे. 264 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 94 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ॲक्टीव रुग्ण संख्या 1344 आहे. तर 80 रुग्ण गंभीर असून, उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 17 हजार 747 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 16 हजार 908 जणांचे अहवाल प्राप्त झाले असून 839 अहवाल प्रतीक्षेत आहेत. प्राप्त अहवालांपैकी 15151 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून, 1702 चा अहवाल पॉजिटिव्ह आहे.








