ऑनलाईन टीम / पुणे :
महाराष्ट्रगांधी स्मारक निधी, गांधी भवन येथे गांधीजींना स्मृतीदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. मॉडर्न हायस्कूलच्या प्राथमिक विभागाच्या चारशे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रार्थना आणि भजन सादर केले.

संदीप बर्वे, नीलम पंडीत, धनंजय पवार, बाबालाल बीडीवाले,धनंजय पवार यांनी गांधीभवन सभागृहात भजने सादर केली. गांधी भवनचे सचिव अन्वर राजन यांनी गांधी विचारांबद्दल मार्गदर्शन केले. संजय सोनटक्के ( नागपूर ), प्राचार्य सुजाता हागवणे, सचिन चव्हाण , युक्रांद आणि गांधी भवनचे कार्यकर्ते, नागरीक सहभागी झाले.








