पुणे/प्रतिनिधी
कोरोना काळातील निर्बंध शिथिल करत अनलॉकबाबतची नवी नियमावली सोमवारी जाहीर केली होती. राज्यभरातील जवळपास २५ जिल्ह्यांना दिलासा मिळणार होता. मात्र पुणे, साताऱ्यासह ११ जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम कायम ठेवले होते. या जिल्ह्यांत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू होते. राज्यातील काही जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे राज्यसरकारने कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता काही जिल्ह्यात निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, या निर्णयावर पुण्यातील व्यापारी महासंघाने नाराजी व्यक्त केली होती. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीनंतर पुण्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
दरम्यान, आज झालेल्या अजित पवारांच्या बैठकीनंतर पुण्यातील निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली. त्यामुळे पुण्यातील सर्व दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु राहणार तर हॉटेल्स रात्री १० पर्यंत सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात शनिवारी आणि रविवारी सर्व सेवांना दुपारी चारपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मॉल्सदेखील सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजेपर्यंत सुुर ठेवण्यास परवानगी दिली असून लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाचा इथे प्रवेश दिला जाणार आहे. १३ तालुक्यात लेव्हल तीनची नियमावली सोमवारपासून लागू केली आहे. ग्रामीणचा दर ५.५ आहे. पण तिथे लेव्हल ४ ऐवजी ३ ठेवली आहे.