ऑस्ट्रेलियात भ्रष्ट नेते, त्यांच्या पत्नींची नावे
अमेरिकेत केवळ महिलांची नावे मिळतात वादळाला
भविष्यात जगभरात येणाऱया 164 वादळांची नावे आताच निश्चित करण्यात आली आहेत. यासनंतर गुल-आब, शाहीन, जवाद आणि असानी वादळ धडकणार आहे. 1953 पूर्वी वादळांना नाव देण्याची कुठलीच प्रणाली नव्हती. चक्रीवादळ अनेक देशांमध्ये नुकसान पोहोचवित असते. आंतरराष्ट्रीय दस्तऐवजांमध्ये एकाच वादळाची विविध नावे असल्याने गोंधळ उडायचा. याचमुळे अटलांटिक महासागर क्षेत्रात एक करार झाला आणि नावे निश्चित केली जाऊ लागली.
अमेरिकेला जेव्हा नाव संधी मिळाली तेव्हा त्याने कुठल्या तरी महिलेचे नाव वादळाला दिले आहे. प्रारंभिक नावे एलिस, बार्बरा, डॉली, रीटा, एडना, फ्लोरेन्स, गॅल आणि हेजल अशी होती.

ऑस्ट्रेलियाने वादळांना स्वतःच्या भ्रष्ट नेत्यांची नावे देण्यास सुरुवात केली. यात ऑड्रे, दिनाह, डॅग अँड डीकीन यासारखी नावे चर्चेत आली. 1973 मध्ये हा नियम बदलून एक पुरुष आणि एका महिलेचे नाव देण्यात येऊ लागले. तेव्हा भ्रष्ट नेत्यांच्या पत्नी आणि प्रेयसीचे नाव ठेवले जाऊ लागले.
जर कुठल्याही वादळाचा वेग 34 सागरी मैल प्रतितासाहून अधिक असल्यास त्याला एक विशेष नाव देणे अनिवार्य असते. वादळी वारे जर 74 मैल प्रतासाच्या वेगापर्यंत पोहोचल्यास किंवा त्याहून अधिक वेग मिळाल्यास त्याला चक्रीवादळ म्हटले जाते.









