बेंगळूर/प्रतिनिधी
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग यांनी गुरुवारी राज्यात नेतृत्व बदल होणार नसून, येडियुराप्पाच मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील असे म्हंटले होते. दरम्यान सरचिटणीस अरुणसिंग निर्णयामुळे त्यांना आणखी बळकटी मिळाली आहे, अशी माहिती कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी शुक्रवारी दिली. तसेच मुख्यमंत्री म्हणून उर्वरित दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू आणि राज्याच्या विकासासाठी काम करू असे प्रतिपादन केले. भाजप उच्च कमांडने ठेवलेल्या विश्वासामुळे त्यांची जबाबदारी वाढली आहे.
कर्नाटकचे प्रभारी अरुण सिंग यांनी राज्यात नेतृत्व बदलाचा प्रश्नच उद्भवत नाही असे गुरुवारी सांगितले आहे. मुख्यमंत्री म्हणून येडियुरप्पा पुढील दोन वर्षे (मुख्यमंत्री) कायम राहतील आणि कार्यकाळ पूर्ण करतील. हा प्रश्न कोठे आहे? असे येडियुरप्पा यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.
दरम्यान शुक्रवारी जिल्ह्यातील अधिकारी व लोकप्रतिनिधींशी झालेल्या आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री म्हणून उर्वरित दोन वर्षे कायम राहणार आणि सर्वांच्या सहकार्याने मी राज्यभरातील विकास आणि दौऱ्यावर लक्ष देणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच राज्यात चांगले काम करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करमार आहे. ‘ (पीटीआय)









