फ्रान्सिस्को
आयफोन निर्मितीतील आघाडीवरची कंपनी ऍपल आपला आयफोन-13 पुढच्या वषी बाजारात दाखल करणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. हा नवा फोन बऱयाचअंशी आयफोन 12 सारखाच असणार आहे, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. या नव्या फोनमध्ये अनेक वैशिष्टय़े असणार आहेत. यात टेंपरेचर पॉलीक्रिस्टलाइन ऑक्सीड डिस्प्ले तंत्रज्ञान असणार आहे. पुढच्या वषी कंपनी एसइ मॉडेलचा कोणताही आयफोन आणणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. आयफोन-12 चा पुरवठा बाजारात लवकरात लवकर केला जात असल्याचे कंपनीने सांगितले आहे.









