वार्ताहर / राशिवडे
पुंगाव (ता. राधानगरी ) येथील एका तरुण शेतकऱ्यांने कर्जाला कंटाळून दारुच्या नशेत आज सकाळी शेतात झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. सुभाष गणपती बरगे ( वय ४० ) असे त्यांचे नाव आहे.
बरगे हे कर्जबाजारी होते. यातून त्यांना दारुचे व्यसन लागले. आज सकाळी ते वैरण आणायला फोड नावाच्या शेतात गेले होते. बराच वेळ ते घरी आले नाहीत. तेथील शेतात दुसरे शेतकरी वैरण आणायला गेले असता एका झाडाला गळफास लावलेली व्यक्ती दिसली. पुढे जावून पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आले.
त्यांनी ही घटना गावात आणि पोलिस पाटलांना सांगितली. पोलीस पाटलांनी राधानगरी पोलीसांना वर्दी दिली. पोलिसांनी घटनास्थळी येवून पंचनामा करून प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी सोळांकूर येथे पाठवले शवविच्छेदन झाल्यावर ते नातेवाईकांच्या ताब्यात दिले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









