वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची माजी अव्वल महिला धावपटू पी.टी. उषाने केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना राज्यातील ऍथलीट्सना शक्यतो लवकर कोरोना लस उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. 25 ते 29 जून दरम्यान होणाऱया राष्ट्रीय आंतरराज्य ऍथलेटिक्स स्पर्धेत देशातील विविध ऍथलीट्स ऑलिंपिक पात्रतेसाठी सहभागी होणार आहेत.
56 वर्षीय पी.टी. उषाने आशियाई क्रीडास्पर्धेत 11 पदके मिळविली आहेत. तसेच तिने 1986 च्या आशियाई स्पर्धेत चार सुवर्णपदकांची कमाई केली होती. आगामी राष्ट्रीय आंतरराज्य ऍथलेटिक्स स्पर्धा पतियाळात 25 ते 29 जून दरम्यान होणार आहे. भारतीय ऍथलीट्सना टोकियो ऑलिंपिकसाठी ही शेवटची पात्रतेची स्पर्धा आहे.









