नवी दिल्ली :
वेगवेगळय़ा सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱया कंपन्या आणि संस्था कोरोनाच्या काळात मदतीसाठी पुढे येत आहेत. यामध्ये आता रिलायन्सने तीन पट स्वस्तामध्ये पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंटची(पीपीई) निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. नियमितपणे 1 लाख पीपीई किटच्या निर्मितीसाठी रिलायन्स कंपनीने सिल्वासा प्रकल्पामध्ये सुरुवात केली आहे. सदरचे किट आयात केल्यावर यांची किमत 2 हजार रुपयापेक्षा अधिक आहे. मात्र रिलायन्सच्या युनिटमधून 650 रुपयात हेच किट उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
रोजगार उपलब्ध
रिलायन्स पीपीई किट निर्मितीसाठी 10 हजार लोकांना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने उत्पादनासाठी विविध उत्पादन केंद्राचा प्रारंभ करणार आहे. काउन्सील ऑफ सायटिफिक ऍण्ड इंस्ट्रीज रिसर्चसोबत मिळून रिलायन्स स्वदेशी आरटी लॅपवर आधारीत कोविड19चे टेस्ट किट तयार करणार आहे.









