श्रीनगर
पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांना प्रशासनाने मंगळवारी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांच्याच घरात पुन्हा स्थानबद्ध केले आहे. मागील आठवडय़ात हल्ला झालेल्या शोपियांमधील काश्मिरी हिंदू कुटुंबांची भेट घेण्यास जाणार होते. केंद्र सरकार जाणूनबुजून मुख्य प्रवाहात जोडले गेलेले काश्मिरी मुस्लिमांना काश्मिरी हिंदूंच्या पलायनासाठी जबाबदार ठरविण्याची दुष्प्रचाराची मोहीम चालवत आहे. हा दुष्प्रचार उघड होऊ नये म्हणून मला स्थानबद्ध करण्यात आल्याचा आरोप मुफ्तींनी केला आहे. शोपियांचा दौरा मेहबूबांच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकत असल्याने प्रशासनाने त्यांना रोखण्यासाठी स्थानबद्ध केले आहे.









