गणेशमूर्ती पर्यावरणस्नेही तर गणेशोत्सव प्रदूषणविरहीत साजरा करण्याचे आवाहन : प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी गोपाळकृष्ण सतसंगी यांची मुलाखत
अनंत कंग्राळकर / बेळगाव
बेळगाव शहरात गणेशोत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा केला जातो. पण ऐन सणाच्या तोंडावरच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घातली जाते. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्यावतीने प्रति÷ापना करण्यात येणाऱया गणेशमूर्तींच्या उंचीचा मुद्दा ऐरणीवर येतो. त्यामुळे भाविकांच्या भावना दुखावल्या जातात. मूर्तीची उंची व पीओपी वापराबाबतचे धोरण गणेशमूर्ती बनविण्यापूर्वीच का ठरविले जात नाही? असा मुद्दा भाविक उपस्थित करतात.
सध्या कोरोना महामारीमुळे जनता हवालदिल झाली आहे. त्यामुळे वायू, ध्वनी आणि जलप्रदूषणाचे गांभीर्य ओळखणे गरजेचे आहे. अशा परिस्थितीमध्ये ईको-फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याच्यादृष्टीने तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कायद्याच्या चौकटीत गणेशोत्सव कसा साजरा करता येईल, याचा विचार होणे गरजेचे आहे. त्यामुळे ऐन सणाच्या तोंडावर लादली जाणारी गणेशमूर्तींच्या उंचीची अट आणि पीओपी बंदीचे कायदे काय आहेत, याबाबतची माहिती घेण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पर्यावरण अधिकारी गोपाळकृष्ण सतसंगी यांची मुलाखत घेतली आहे.
प्रश्न : गणेशोत्सव महिन्यावर येऊन ठेपल्यानंतर पीओपी बंदीची अंमलबजावणी करण्याचे प्रयोजन काय?
गोपाळकृष्ण सतसंगी ः प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती बनवू नये, तसेच वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू नये, असे सातत्याने आवाहन केले जाते. वास्तविक पाहता प्लास्टर ऑफ
पॅरिसच्या मूर्ती बनविण्यावर व वाहत्या पाण्यात विसर्जित करण्यावरील बंदीचा कायदा 2016 मध्ये अंमलात आणला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दरवषी केवळ जनजागृती केली जाते. पीओपी पाण्यामध्ये विरघळत नाही. पीओपी आणि मूर्तीला केल्या जाणाऱया रंगांमुळे जलप्रदूषण होते. नागरिकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, याचा विचार लक्षात घेऊन काटेकोरपणे अंमलबजावणी केली जात नाही. पण दरवषी जागृती करून शाडू आणि धातूंच्या मूर्तींची प्रति÷ापना करावी, असे आवाहन केले जाते.
प्रश्न : गणेशोत्सव जवळ आला की प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदीची कारवाई केली जाते. सातत्याने ही कारवाई का केली जात नाही?
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या वापरावरील बंदी 2016 पासूनच अंमलात आणली आहे. ही कारवाई काटेकोरपणे केली असता भावनेचा प्रश्न निर्माण होतो. कारण प्रत्येकजण भक्तीभावाने गणेशोत्सव साजरा करीत असतात. भाविकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, याकरिता पीओपी बंदीची सक्ती अद्याप केली नाही. पण भविष्य काळात यावर पूर्णपणे बंदी केली जाईल.
प्रश्न : मूर्तिकारांसोबत बैठक घेऊन पीओपी बंदीच्या कायद्याची माहिती दिली आहे का?
प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिकेच्यावतीने मागीलवषी मूर्तिकारांची बैठक आयोजित करून चर्चा केली होती. पीओपी बंदीबाबतच्या कायद्याची माहिती दिली होती. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करू नये, शाडूच्या मूर्ती बनविण्यात याव्यात, तसेच मूर्तींची उंची कमीत कमी असावी, वाहत्या पाण्यात गणेशमूर्ती विसर्जित करू नयेत, अशा विविध सूचना केल्या होत्या. यंदा कोरोनामुळे मूर्तिकारांची बैठक अद्याप आयोजित केली नाही. पण लवकरच बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
प्रश्न : पीओपीच्या गणेशमूर्ती बनविणारे व त्या खरेदी करणाऱयांवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद प्रदूषण नियंत्रण कायद्यात आहे का?
पीओपीचा वापर करून गणेशमूर्ती बनविणाऱया मूर्तिकारांवर कारवाई करण्याची तरतूद कायद्यात केली आहे. पीओपीचा वापर केल्यास 2 लाख रुपये दंड आणि 2 वर्षे कारावास होऊ शकतो. हीच कारवाई करण्याची तरतूद पीओपीच्या मूर्ती खरेदी करणारे व वाहत्या पाण्यात मूर्ती विसर्जित करणाऱयांसाठी देखील आहे.
प्रश्न : परराज्यांतून येणाऱया पीओपीच्या मूर्तींबाबत कोणती कारवाई केली जाणार? यापूर्वी परराज्यांतून येणाऱया पीओपीच्या गणेशमूर्तींबाबत कारवाई केली आहे का?
परराज्यांतून येणाऱया पीओपीच्या गणेशमूर्तींबाबत यापूर्वी कोणतीच कारवाई केली नाही. पण परराज्यांतून येणाऱया पीओपीच्या गणेशमूर्तींवर बंदी घालण्याच्यादृष्टीने आवश्यक उपाययोजना राबविण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासन व महापालिकेच्या सहकार्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ही कारवाई केली जाईल.
प्रश्न : शाडूच्या तसेच ईको-प्रेंडली गणेशमूर्ती बनविण्याबाबत जनजागृती केली होती का?
शाडूच्या व ईको-प्रेंडली गणेशमूर्ती बनविण्याचा प्रयत्न प्रदूषण नियंत्रण मंडळाने मागील दोन वर्षांपासून चालविला आहे. महिला मंडळ, लघु उद्योजक महिलांच्या माध्यमातून शाडूच्या व ईको-प्रेंडली गणेशमूर्ती बनवून वितरित केल्या होत्या. मागीलवषी 1 हजारांहून अधिक गणेशमूर्ती शाडूच्या बनवून नागरिकांना अल्पदरात वितरित केल्या होत्या. यावषीदेखील ही मोहीम राबवून नागरिकांसाठी शाडूच्या मूर्ती व ईको-प्रेंडली मूर्ती बनविण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे.
प्रश्न : नदी-नाले, विहिरी व वाहत्या पाण्यात पीओपीच्या मूर्ती विसर्जित करू नयेत, याकरिता कोणती कारवाई केली?
नदी-नाले, विहिरी व वाहत्या पाण्यात गणेशमूर्ती विसर्जित करू नयेत, याकरिता सातत्याने जागृती केली जाते. ज्या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जित केल्या जातात, तेथील पाण्याची चाचणी केली जाते. गणेशोत्सवापूर्वी आणि विसर्जनानंतर पाण्याची चाचणी केली असता पाण्यामध्ये मिसळणाऱया रंग व केमिकल्समुळे पाणी प्रदूषित होते. याबाबतचा प्राप्त झालेला अहवाल खूपच घातक असून अशा पाण्याचा वापर केल्यास नागरिकांना तसेच जीवजंतू, प्राणीमात्रांसाठी घातक आहे.
प्रश्न : वाहत्या पाण्यात किंवा नदी-विहिरींऐवजी पीओपी मूर्ती विसर्जित करण्यासाठी पर्याय कोणता?
वाहत्या पाण्याचे किंवा नदी, विहिरींचे प्रदूषण रोखणे काळाची गरज आहे. याकरिता महापालिकेने ठिकठिकाणी विसर्जन तलाव निर्माण केले आहेत. त्या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जित केल्या जातात. तसेच मोबाईल विसर्जन टँक उपलब्ध करून दिली जाते. वाहनांमध्ये टाक्मया ठेवून नागरिकांच्या दारात गणेश विसर्जनाची सुविधा उपलब्ध केली जाते. गणेश विसर्जनासाठी मागीलवर्षी 30 वाहने उपलब्ध करण्यात आली होती. टाकीमध्ये शास्त्राsक्त पद्धतीने गणेशमूर्तींचे विसर्जन केल्यानंतर वैज्ञानिक पद्धतीने पीओपीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते. विसर्जन तलावातील पाण्यावरही प्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला होता. पण खर्चिक असल्याने पाण्यावरील प्रक्रिया केली नाही. मात्र, यंदा पाण्यावर प्रक्रिया करण्याचा विचार आहे.
प्रश्न : पीओपीच्या गणेशमूर्ती पाण्यामध्ये विसर्जित केल्यास त्यापासून कोणते आजार होतात?
पीओपीच्या गणेशमूर्ती बनविताना केमिकल्सचा सर्रास वापर होतो. गणेशमूर्ती रंगविण्यासाठी वापरण्यात येणाऱया रंगांमध्ये केमिकल्स असतात. पाणी प्रदूषित झाल्यानंतर विशेषतः सिल्व्हर कलरमुळे मोठा धोका निर्माण होतो. अशा पाण्याचा अंश आपल्या शरीराच्या संपर्कात आल्यास रंगामध्ये असलेल्या केमिकल्समुळे थेट शरीरातील नसांवर परिणाम होतो. मक्मर्युरी विषाणूमुळे हाडे ठिसूळ बनतात. वृद्ध व लहान मुलांवर लवकर परिणाम होत असल्याचे वैज्ञानिकदृष्टय़ा सिद्ध झाले आहे. त्यामुळे होणाऱया परिणामांचा विचार करून शासनाने पीओपी मूर्ती बनविण्यावर तसेच वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करण्यावर बंदी घातली आहे. त्याकरिता नागरिकांनी तसेच गणेशोत्सव मंडळांनी स्वयंस्फूर्तीने पीओपीच्या मूर्ती टाळाव्यात आणि ईको-प्रेंडली मूर्तींची प्रति÷ापना करण्यावर भर द्यावा.
प्रश्न : जल प्रदूषणाबरोबरच वायू आणि ध्वनी प्रदूषणाचाही मुद्दा गणेशोत्सवावेळी निर्माण होतो.याबाबत आपण कोणती कारवाई करता?
गणेशोत्सवादरम्यान डॉल्बीचा आणि फटाक्मयांचा वापर मोठय़ा प्रमाणात केला जातो. गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी मोठय़ा आवाजात डॉल्बी लावल्या जातात. तसेच फटाक्मयांची आतषबाजीही होत असते. त्यामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण होते. डॉल्बी व फटाक्मयांमुळे लहान मुले आणि वृद्धांना जास्त त्रास होतो. डॉल्बीच्या आवाजामुळे हृदयाघाताचे प्रकार घडतात. त्यामुळे डॉल्बी व फटाक्मयांमुळे होणाऱया प्रदूषणावर बंदी घालण्यात आली आहे. मागीलवषी 15 सार्वजनिक मंडळांवर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे शिफारस केली होती.
प्रश्न :पीओपी बंदी आणि ईको-प्रेंडली गणेशोत्सवाच्यादृष्टीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि भाविकांची जबाबदारी कोणती?
पीओपी बंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे केली तर पीओपींच्या मूर्ती बनविणे बंद होऊ शकते. पण गणेशभक्तांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांनी पीओपी बंदीच्या कायद्याचा विचार करावा. मंडळांच्या पदाधिकाऱयांनी पुढाकार घेऊन ईको-प्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करावेत. फुले, फळे आणि पाण्यामध्ये विरघळणाऱया वस्तूंपासून बनविण्यात येणाऱया ईको-प्रेंडली गणेशमूर्तींची प्रति÷ापना नागरिकांनी करावी. वेळेचे भान पाळा, डॉल्बी व फटाक्मयांचा वापर टाळा, तसेच पीओपी मूर्ती बनवू नयेत, असे आवाहन सर्व जनतेला व भाविकांना प्रदूषण नियंत्रण मंडळाच्यावतीने करीत आहोत. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कायद्याचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. त्यामुळे मूर्तिकारांनी पीओपीच्या मूर्ती बनवू नयेत, असे आवाहन करण्यात येत आहे.
प्रश्न : ईको-प्रेंडली गणेशोत्सवासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून स्पर्धांचे आयोजन केले जाते का?
ईको-प्रेंडली गणेशोत्सवासाठी आतापर्यंत कोणतेच उपक्रम राबविण्यात आले नाहीत. पण यंदा स्पर्धा आयोजित करण्याच्यादृष्टीने प्रयत्न करणार आहोत. उत्कृष्ट मंडळाची निवड करून जिल्हा प्रशासनाच्यावतीने पारितोषिक देण्याचा विचार आहे.









