ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन जारी करण्यात आले आहे. या लॉक डाऊन च्या काळात सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांचे हाल होत आहेत. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींना पीएम केअर मध्ये मदत करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
मात्र, यावरूनच काँग्रेस पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी आज सरकारवर जोरदार टीका केली आहे. लॉक डाऊनमध्ये सामान्य जनतेसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यांना अन्नधान्य आणि रोख रकमेची टंचाई जाणवत असताना प्रशासन मात्र पीएम केअरसाठी 100-100 रुपयांची वसुली करत आहे, असा आरोप प्रियांका गांधी यांनी लावला आहे.
त्या म्हणाल्या, उत्तर प्रदेशात देखील अशा प्रकारे 100 रुपयांची वसुली सुरू आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत पीएम केअरचे सरकारी ऑडिट होणे गरजेचे आहे.तसेच सरकार कडून देशातून पळून गेलेल्या बँक चोरांचे 68 हजार कोटी रुपये माफ केले गेले आहेत. त्या प्रकरणाचा हिशेब झाला पाहिजे असं त्या यावेळी म्हणाल्या.
पुढे त्या म्हणाल्या, सध्या जनता मोठ्या संकटाचा सामना करत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा जनतेसमोरच हा व्यवहार पारदर्शी कारभार होणे गरजेचे आहे. यामध्येच जनता आणि सरकार या दोघांचे हित आहे. असं ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.









