शेतकऱ्यांची चिकाटी आणि उत्कटता प्रेरणादायक आहे : पंतप्रधान
नवी दिल्ली /प्रतिनिधी
शेतकऱ्यांना सन्मानाचे आणि समृद्धीचे जीवन मिळावे या उद्देशाने सुरू केलेल्या पीएम-किसान योजनेला आज दोन वर्षे पूर्ण झाली आहेत.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटमध्ये , “२ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पीएम -किसान योजना सुरु करण्यात आली ज्याचा उद्देश आपल्या देशाच्या पोषणासाठी दिवसरात्र झटणाऱ्या कष्टकरी शेतकऱ्यांना सन्मान आणि समृद्धीचे जीवन सुनिश्चित करणे हा होता. आपल्या शेतकऱ्यांची चिकाटी आणि उत्कटता प्रेरणादायक आहे.
“गेल्या ७ वर्षात केंद्र सरकारने कृषी क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. चांगल्या सिंचन सुविधा, अद्ययावत तंत्रज्ञान, अधिक पत पुरवठा आणि बाजारपेठ, योग्य पीक विमा, मातीच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे, दलालांना दूर ठेवणे हे सर्वसमावेशक प्रयत्न यात अंतर्भूत आहेत.
एमएसपीत ऐतिहासिक वाढ करण्याचा मान आमच्या सरकारला मिळाला. आम्ही शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. तुम्हाला नमो ऍपवर शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामांची झलक दाखवणारी माहिती मिळू शकेल.
पीएम किसान निधि सुरु केल्याला आज दोन वर्षे पूर्ण होत आहेत. अन्नदात्यांच्या कल्याणासाठी समर्पित या योजनेमुळे कोट्यवधी शेतकरी बंधू-भगिनींच्या जीवनात जे परिवर्तन झाले आहे , त्यातून आम्हाला त्यांच्यासाठी आणखी काम करण्याची प्रेरणा मिळाली आहे.
अन्नदात्यांचे जीवन सुलभ बनवणे आणि त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा जो संकल्प देशाने केला आहे , त्यात पीएम किसान निधीची महत्वपूर्ण भूमिका आहे. आज आपले शेतकरी आत्मनिर्भर भारत अभियानाचा अविभाज्य घटक बनत आहेत.”