नवी दिल्ली
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थाकडून (ईपीएफओ) पीएफचे व्याज दर 8.65 टक्क्यांनी कमी करण्याची शक्यता आहे. जर असे झाल्यास याचा थेट परिणाम ईपीएफओच्या 8 कोटींपेक्षा अधिक खातेदारांवर होणार आहे. पीएफवर अधिक परतावा देण्यासाठी बँकांना आकर्षक व्याज दर देणे शक्य नाही. याचा थेट परिणाम अर्थव्यवस्थेवर पडणार असल्याची चिंता अर्थ मंत्रालयाला आहे. 2018-19 मध्ये सेवानिवृत्ती निधी व्यवस्थापक यांनी अर्थ मंत्रालयाशी सविस्तर चर्चा केल्यानंतर आपल्या ग्राहकांसाठी 8.65 टक्के दर निश्चित केला होता. पीएफ सारख्या छोटय़ा बचत योजना आणि ईपीएफओकडून अधिक व्याजदर देल्यामुळे लोक बँकांकडे रक्कम ठेवत नाहीत. त्यामुळे बँकांना फंड निर्माण करण्याच्या अडचणीत वाढ झाल्याचे एका अहवालातून स्पष्ट झाले आहे.








