प्रतिनिधी / कराड
नारायणवाडी ता. कराड येथे रेकॉर्डवरील संशयिताकडून गावटी बनावटीचे पिस्टल हस्तगत करण्यात आले. कराड ग्रामिण पोलिसांनी शनिवारी दुपारी ही कारवाई केली. याप्रकरणी अभिजीत दत्तात्रय विभुते ( वय 45 रा. कालेटेक ता. कराड) याला ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस निरिक्षक किशोर धुमाळ यांनी दिली.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शनिवारी सकाळी पोलीस निरिक्षक किशोर धुमाळ यांना पिस्टलबाबत गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश कड, हवालदार सज्जन जगताप, अमित पवार, शशिकांत काळे, शशिकांत घाडगे हे संशयितावर पाळत ठेवून होते. दरम्यान नारायणवाडी ता. कराड हद्दीत प्रणव वाईन शॉपच्या पुढे सर्विसरोडवर अभिजीत विभुते असल्याचे समजल्याने पोलीस तिकडे धावले.
पोलिसांनी त्याला पकडले. त्याची अंगझडती झडती घेतली असता त्याच्या जीन्समध्ये एक सिल्वर रंगाचे काळी मुठ असलेले देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल मिळुन आले. पोलिसांनी ते पंचासमक्ष ताब्यात घेतले. पोलिसांनी पिस्टलसह संशयिताला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. त्याला अटक करण्यात आली. पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांनी पोलीस निरिक्षक किशोर धुमाळ, सहाय्यक पोलीस निरिक्षक गणेश कड, हवालदार सज्जन जगताप, अमित पवार, शशिकांत काळे, शशिकांत घाडगे यांच्या पथकाचे कौतूक केले.









