प्रतिनिधी/ वाळपई
सत्तरी तालुक्मयातील पिसुर्ले पंचायत क्षेत्रातील बेकायदेशीर चिरेखाणीच्या व्यवसाय गेल्या काही महिन्यांपासून गाजत आहे. मात्र सरकारची यंत्रणा अपेक्षेप्रमाणे कारवाई करीत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता व्यवसायिकांनी नैसर्गिक नाल्याच्या परिसरामध्ये चिरेखाणीचा व्यवसाय सुरू केल्याची माहिती उघड झाली आहे .यामुळे नैसर्गिक विविधतेवर व्यवसायिकांनी आपला कब्जा केल्यामुळे येणाऱया काळात त्याचे गंभीर परिणाम उद्भवण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. पंचायत जैवविविधता समितीचे सभासद व सामाजिक कार्यकर्ते हनुमंत परब यांनी यासंदर्भात तक्रार करणार असल्याचे स्पष्ट केले असून या नाल्याची याठिकाणी होणारा बेकायदेशीर खाण व्यवसाय बंद करण्याची मागणी केली आहे.
पिसुर्ले पंचायत क्षेत्रांमध्ये बेकायदेशीर खाणीचा व्यवसाय सुरू आहे. सध्यातरी खाण खाते त्याचप्रमाणे वाळपई मामलेदार कार्यालयाची यंत्रणा उपजिल्हाधिकारी कार्यालयाची यंत्रणा यासंदर्भात कारवाई करत नसल्याचे उघड झालेले आहे. यामुळे चिरेखाणवाल्यांनी आता आपला मोर्चा नैसर्गिक स्तरावर असलेल्या ओहोळय़ाच्या ठिकाणी वळविला आहे.
नैसर्गिक नाला परिसरात व्यवसाय सुरु
महत्त्वाची बाब अशी की या परिसरातील जास्तीत जास्त लोकांनी हा सरकारी जमिनीच्या मालकीमध्ये आहे. आतापर्यंत लाखो रुपयांचा व्यवहार सरकारी मालकीच्या जमिनीमध्ये चिरे काढून करण्यात आलेला आहे. सरकारची यंत्रणा कोणत्या प्रकारची कारवाई करीत नसल्याने आता त्याने आपल्या मोर्चा नैसर्गिक साधनसंपत्तीच्या ठिकाणच्या परिसरामध्ये वळविल्याचे चित्र समोर आले आहे. महत्वाचे म्हणजे स्मशानभूमीच्या ठिकाणी असलेल्या नैसर्गिक ओहोळात व्यवसाय सुरू झालेले आहे.
पावसाळी मोसमामध्ये यानदीच्या नाल्यातून पाण्याचा प्रवाह जाण्याची वाट आहे .सध्याच्या व्यवसायाच्या माध्यमातून हा नाला येणाऱया काळात नष्ट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सदर नाला नष्ट झाल्यास त्याचे गंभीर परिणाम येणाऱया काळात होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही.
तक्रार दाखल करणार
या पंचायत क्षेत्रातील जैवविविधता यांचे संवर्धन व रक्षण होण्यासाठी पंचायतीतर्फे जैवविविधता समितीचे गठण करण्यात आलेले आहे. यासमितीचे सभासद हनुमंत परब यांनी यासंदर्भात पाहणी करून आपण यासंदर्भात तक्रार दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याभागांमध्ये सरकारच्या जमिनीमध्ये मोठय़ा प्रमाणात व्यवसाय सुरू करून सरकारला आव्हान देण्याच्यापलीकडे व्यवसायिकांनी आपले मजल मारलेली आहे. यासंदर्भात कारवाई करण्याची मागणी करून सुद्धा त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. आता त्यांनी आपला मोर्चा याभागातील नाल्याकडे वळविला आहे.
याभागातील जैवविविधता हे पूर्णपणे खाण उत्खनन त्यांच्या माध्यमातून नष्ट झालेले आहे. आता ती चिरेखणीच्या माध्यमातून हे नवीन सरपंच संकट उभे राहिले असून याभागातील शिल्लक राहिलेली जैवविविधता याव्यवसायाच्या माध्यमातून पुन्हा एकदा कायमस्वरूपी नष्ट होण्याची भीती हनुमंत परब यांनी व्यक्त केली आहे.









