प्रतिनिधी /वाळपई
सध्या गोव्यातील खनिज खाणीचे काम बंद आहे. सध्या खनिज खाणी या सरकारच्या मालकीच्या बनलेल्या आहेत. यामुळे सरकारने निर्देशित केल्याप्रमाणे ई लिलावच्या माध्यमातून खनिज माल विक्री करण्यात येणार आहे .अशा पद्धतीचा ई लिलाव नुकताच करण्यात आला असून येथे दामोदर मंगलजी कंपनीच्या आवारात असलेला तीन लाख मेट्रिक टन हा सेसा गोवा खाण कंपनीने घेतलेला आहे. त्या संदर्भाची वाहतूक गेल्या काही दिवसापासून सुरू झालेली आहे. मात्र ही वाहतूक करताना नियमांचे उल्लंघन होत असून यामुळे प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहे. यामुळे सार्वजनिक रस्त्यावरून वाहतूक करताना मोठय़ा प्रमाणात अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत असल्यामुळे त्यावर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीकोनातून संबंधित खात्याचे यंत्रणेने विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे.
सेसा गोवा खाण कंपनीने तीन लाख मेट्रिक टन लिलावाच्या माध्यमात विकत घेतलेला आहे. सरकारच्या परवानगीने त्याची वाहतूक गेल्या चार दिवसांपूर्वी सुरू झालेली आहे. या भागातील खाणीतून ही वाहतूक होत असून याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे होते. मात्र सरकारची यंत्रणा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्यामुळे वाहतूक करताना आवश्यक स्वरूपाच्या तरतुदीचे पालन होत नसल्यामुळे याचा थेट परिणाम नागरिकांना भोगावा लागत आहे.
वाहतूक करताना व्यवस्थितपणे ताडपत्री आच्छादन घालणे गरजेचे आहे. मात्र अनेक गाडय़ा आच्छादन घालण्यापूर्वी खनिज मालाची वाहतूक करीत असल्याचे समोर आलेले आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होत असून सध्या तरी सोनशी हा भाग पुन्हा एकदा प्रदूषणाच्या चक्रात सापडलेला आहे. या रस्त्यावरून वाहतूक करणारे अनेक नागरिकांना मात्र याबाबत मनस्ताप सहन करावा लागत असून सरकारची यंत्रणा याकडे का दुर्लक्ष करीत आहे अशा प्रकारचा सवाल तमाम नागरिकांनी केलेला आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते हनुमंत परब यांनी सरकारवर टीकास्त्र केलेले आहे. सरकारच्या परवानगीने ही वाहतूक सुरू आहे. यामुळे या वाहतुकीवर सरकारचे पूर्णपणे नियंत्रण असणे गरजेचे आहे .या बाबतीत स्थानिक उपजिल्हाधिकारी मामलेदार यंत्रणा व पोलिस यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. मात्र एकूण परिस्थिती पाहिल्यास या सर्व यंत्रणेचे या वाहतुकीकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप हनुमंत परब यांनी केलेला आहे.
खनिज मालाची वाहतूक करताना आवश्यक मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे खनिज मालाची वाहतूक करणारा ट्रक जेव्हा सार्वजनिक रस्त्यावर येतो तेव्हा त्यांचे टायर पाण्याने धूवून टायरना लागलेली धूळ साफ करणे गरजेचे आहे. मात्र ही प्रक्रिया करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे सार्वजनिक रस्त्यावर मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होत असल्याचा आरोप हनुमंत परब यांनी केलेले आहे.
यामुळे सरकारी यंत्रणेचे हात ओले होत असल्याचा आरोप परब यांनी केलेले आहे. यामुळे या प्रकरणी गांभीर्याने लक्ष न दिल्यास येणाऱया काळात त्याच्या विरोधात कायदेशीर लढा देण्याचा इशारा त्यांनी दिलेला आहे आहे.
त्याचबरोबर यासंदर्भात अधिक माहिती देताना हनुमंत परब यांनी सांगितले की ज्याठिकाणी ई-लिलाव करण्यात आलेला माल भरण्याचे काम सुरू आहे. त्यावर पूर्णपणे नियंत्रण असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण ज्या पद्धतीने ही वाहतूक होत आहे ते पाहिल्यास पुन्हा एकदा खनिज परिसरामध्ये उत्खनन होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. तसे झाल्यास सुप्रीम कोर्टाचा अवमान होण्याची शक्यता असून याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.









